सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत घोराडेश्वर येथे १६ प्रकारच्या जातींची १०१ देशी रोपांची लागवड

0
435

देहूरोड,दि.०२(पीसीबी) – वृक्ष रोपण मोहीम उपक्रम दोन दिवसीय प्रकारात राबवण्यात आला.प्रथम दिवसीय दि.२९ आगस्ट २०२० रोजी ९० देशी रोपे डोंगर माथ्यावर लावण्यात आले व दुसऱ्या दिवशी दि.३० आगस्ट २०२० ला सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे सर व सन एज मार्केटिंग प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक व नव्याने बसविण्यात आलेल्या तोरणा किल्ल्यावरील प्रवेशद्वाराचे शिल्पकार श्री.छगनजी राठोड साहेब तसेच निसर्गराजा मित्र जिवाचे ह्या संस्थेचे श्री सागर वाघ, श्री राहुल घोलप ह्या सर्व मान्यवरांच्या हस्ते डोंगर पायथ्याला ११ देशी रोपे लावून संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.

या उपक्रमात निसर्गराजा मित्र जिवाचे यांच्याकडून या मोहिमेस १०१ रोपे मिळाली व घोराडेसश्वर लेक/सुपुत्र टीम चे मार्गदर्शन लाभले या मोहिमेत चिंचवड विभागाचे दुर्गसेवकांनी व नमस्कार मावळ टीम ने खारीचा वाटा उचलला.

तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराचे शिवा भांडेकरी, समर्थ नागठाण, लकी जोशी, तुषार ठाकरे, ऋषिकेश ठाकरे,रविराज काळे, हर्ष अगरवाल,आकाश किरवे, प्रनव काळे, वैष्णव डाखोरे, सुहास होणे , दिपक बोराटे ,रोहित जंगम ,शुभम पाटील, सुरज गोजमगुंडे, निमिश सराटकर, यश ताबटकर, राहुल भोसले, प्रकाश काची, ऋषिकेश ईल्लाळेे व घोराडेसश्वर लेक/सुपुत्र चे महेश पवार आदी दुर्गसेवक चे सहकार्य लाभले.