सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

0
571

नांदेड, दि.२० (पीसीबी) – नांदेड येथील बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडित विद्यार्थीनी साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यलयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थ्यीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या आईने मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याऊलट या घटनेची वाच्यता कुठेही करु नये यासाठी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले अशी माहिती मिळत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहे.