सर्वांना मोफत शिक्षण, मोफत आरोग्य मिळाले पाहिजे हेच खरे रामराज्य – सौ. मीनाताई जावळे, शहराध्यक्ष, आप

0
43

दि १८ एप्रिल (पीसीबी ) – रामनवमीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीतर्फे निगडी प्राधिकरण येथे प्रभू श्रीराम मंदिरासमोर राम भक्तांना व नागरिकांना मिठाई वाटून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शहराध्यक्ष सौ. मीनाताई जावळे राम भक्तांना शुभेच्छा देताना म्हणाले की, प्रभू श्रीरामा वर आमची प्रचंड आस्था व श्रद्धा आहे. आम आदमी पार्टीचे धोरण आहे की, भारतातील गरिबातील गरीब विद्यार्थ्याला मोफत शिक्षण देणे, मोफत वीज पुरवणे, मोफत चांगली आरोग्य सेवा पुरवणे, खरे तर हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, जेंव्हा हे नागरिकांना मिळेल त्यावेळेसच भारतामध्ये रामराज्य आले असे आपण समजू.

रामनवमीच्या निमित्ताने आम्ही प्रभू श्रीरामाला वचन देतो की, आम्ही दिल्लीमध्ये व पंजाब ज्याप्रमाणे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा, व मोफत वीज देतो आहे तसेच भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये ह्या मूलभूत सुविधा नागरिकांना देऊन राम राज्याची स्थापना करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

याउलट बीजेपीला प्रभू श्रीरामाची आठवण फक्त निवडणुका आल्या की होते, गेली 10 वर्ष बीजेपी चे केंद्रात सरकार आहे बीजेपी ने जनतेसाठी एकही काम केलं नाही. प्रचंड बेरोजगारी, प्रचंड महागाई आणि इलेक्ट्रॉल बोंड रुपी प्रचंड भ्रष्टाचार बीजेपी ने केला आहे, यावेळी प्रभू श्रीराम खोटारड्या लोकांना चांगला धडा शिकवेल.

ह्यावेळी शहराध्यक्ष मीनाताई जावळे, सीता केंद्रे, प्रशांत कोळवले, वैजनाथ शिरसाट, कमलेश रणावरे, ब्रह्मानंद जाधव, अमर डोंगरे व चंद्रमणी जावळे उपस्थित होते.