सरकारला  स्वस्थ बसू देणार नाही; एकनाथ खडसेंचा सुचक इशारा   

0
433

जळगांव, दि. १८ (पीसीबी) – नाथाभाऊला तिकीट नाही दिले, तर काय नाथाभाऊ गप्प बसणार आहे का? विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही,  असा सुचक इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने  खडसे पक्षांवर नाराज आहेत. त्यामुळे खडसेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यातील मलकापूर येथे युतीचे उमेदवार चैनसुख सांचेती यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ख़डसे म्हणाले की, मला उमेदवारी मिळणार नाही, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि माझ्यात चर्चा झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का?,  असा प्रश्नही खडसे यांनी केला.

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाची ऑफरही दिली होती, ते थेट एबी फॉर्म घेऊनच माझ्याकडे आले होते,  असा  गौप्यस्फोटही खडसेंनी केला होता.  भाजपने खडसेंची मुलगी रोहिणी खडसेंना विधानसभेची उमेदवारी देऊन खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.