“समीर कोणाच्या चुकीच्या ऑर्डर ऐकत नाही, पैसे खात नाही. त्यामुळे त्यांची बदली झाली तर… “

0
242

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वी ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकले. त्यांनी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. आता तरीही झालेल्या आरोपांमुळे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र असं असतानाच समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी बदलीसंदर्भात आपलं मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलं आहे.

“आम्हाला धमकावलं जात आहे. समीर वानखेडेंवर केले जाणार आरोप हे चुकीचे असून खरं काय आहे ते आम्ही सरकारी कागदपत्रांसहीत दाखवलं आहे. समीर तिथून हटले तर कोणाचा फायदा होणार हे शोधलं पाहिजे. ज्या पद्धीने समीर यांच्याबद्दलची माहिती काढली जातेय त्यासाठी पैसे लागतात. हे काही ड्रग्ज पेडलर्सचं वगैरे काम नाहीय. यासाठी प्रायव्हेट डीटेक्टीव्ह वगैरे लागतात. एवढं पैसे टाकतायत तर काहीतरी हेतू असणार, असा दावा क्रांतीने सांगितला तर पुढे क्रांती असंही म्हणाल्या कि, “हा अजेंडा आहे की त्यांना या जागेवरुन काढून टाकायचं आहे. कारण की सच्चा माणूस आहे. कोणाच्या चुकीच्या ऑर्डर ऐकत नाही, पैसे खात नाही, इमानदार आहे. तर अशी माणसं टीकत नाहीत. खऱ्याचा जमाना नाहीय. त्यामुळे त्यांची बदली झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. सोशल नेटवर्किंगवर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात आहे. रोज आम्हाला शिव्या दिल्या जातात, वाईट बोललं जातं आहे. आणि हे प्रकार ओपनली होत आहे आणि आम्ही काहीच करु शकत नाही”, असं म्हणत क्रांती यांनी खंत व्यक्त केली.