समाजात सलोखा राखायचा आहे – श्री श्री रवि शंकर

0
598

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला. मध्यस्थांच्या या समितीमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला या समितीचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर श्री श्री रविशंकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सर्वांचा आदर राखून, स्वप्न साकार करणे. प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या या वादाचा आनंददायी शेवट आणि समाजात सलोखा राखणे या लक्ष्याच्या दिशेने आपल्या सर्वांना मार्गक्रमण करायचे आहे असे रविशंकर यांनी मध्यस्थ म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर टि्वट केले आहे.