सत्तेसाठी भाजपाने महाराष्ट्रात निर्लज्ज प्रयत्न केले – सोनिया गांधी

0
638

 

मुंबई, दि.२८ (पीसीबी)- राज्यात महिनाभराच्या सत्तासर्घषानंतर आज महाविकास विकासआघाडीचे सरकार येत आहे. शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी महिनाभरात घडलेल्या राज्यातील नाट्यमय घडामोडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थनाने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन केलेले तीन दिवसांचे सरकार या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी  भाजपावर तोफ डागली आहे.

”भाजपाने महाराष्ट्रात निर्लज्ज प्रयत्न केले” पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचे प्रयत्न फसले. असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी येण्याबाबत सध्यातरी काही ठरलेले नाही असेही त्यांनी सांगितलं आहे.

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर दिमाखदार सोहळ्यात हा शपथविधी आज सायंकाली पार पडणार आहे. दरम्यान, आघाडीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधीला हजर राहणार नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी काल तातडीने दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना वैयक्तिकरित्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.