मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

0
392

मुंबई,दि.२८(पीसीबी) – मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नाही. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारच होणार असून ते आज शपथ घेणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

महाराष्ट्राला २० वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढली तर उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आता राज्याचा कारभार चालवणार आहे.

उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप सांगण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेतील, अशी चर्चा आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचं नावही चर्चेत आहे.

दरम्यान आम्ही विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली होती, पण आता कामाची संधी मिळत असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं.