सत्तेत आहात म्हणून मनमानी करु नका; उच्च न्यायालयाने शिवसेनेला सुनावलं

0
432

मुंबई, दि.११ (पीसीबी) – मुंबई पोर्ट ट्रस्टला पाणीपुरवठा करणाऱ्या हार्बर वाॅटर सप्लायर्स सर्विसेसला पाणीपुरवठा जैसै थे ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. असे असतानाही मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयाने जाधव यांना चांगलेच सुनावले आहे.

अधिकार नसताना तुम्ही हा निर्णय घेतला कसा? अशाप्रकारचा कारभार खपवून घेतला जाणार नाही. सत्तेत आहात म्हणून मनमानी करु नका, अशा कडक शब्दांत न्यायालयाने महापालिका व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची कानउघाडणी केली आहे.