बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले

0
359

बारामती, दि.११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार आज बारामतीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामतीत आले होते. राज्यात निवडणुक निकालानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतर अजित पवार हे पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अजित पवार शहरात आल्यानंतर मुख्यरस्त्यावरून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली.

३  तास चाललेली ही मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी सांगता सभा झाली या सभेत अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले.यावेळी बारामतीकरांनी फक्त मलाच नाही तर रोहित पवारांनाही निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केले असे स्पष्ट केले.