सचिन तेंडुलकरकडून लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

0
513

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९० वा वाढदिवसानिमित्त आज (शनिवार) त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील अनोख्या पद्धतीने  एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत लता मंगेशकर यांना टॅग केला आहे. तसेच यावर त्यांने लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचेही लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लतादीदींबरोबच्या आठवणींनादेखील उजाळा दिला आहे.

जेव्हा मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत झोपायचो तेव्हापासून मी तुमची गाणी ऐकत आलो आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू तर तुमचं पहिलं गाणं कधी ऐकलं हे मला आठवत नाही, असेही त्यांने यामध्ये  म्हटले आहे.

‘तू.. जहां.. जहां… चलेगा, मेरा साया साथ होगा…’ हे गाण तुम्ही माझ्यासाठी गायले होते. ते माझ्यासाठी मोठे गिफ्ट होते. जर देवाने मला कोणते मोठे गिफ्ट दिले असेल, तर त्या लता मंगेशकर यांच्या रूपात दिले आहे, असेही तेंडूलकर यांनी  म्हटले आहे.