सकाळच्या वेळी घरातून तीन मोबईल फोन चोरीला

0
223

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : सकाळच्या वेळी घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून तीन मोबईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साते ते आठ वाजताच्या सुमारास गजानननगर, रहाटणी येथे घडली.

शकील समीउल्ला शेख (वय 44, रा. रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख त्यांच्या घरात बेडरूममध्ये झोपले होते. मंगळवारी सकाळी सहा ते आठ वाजताच्या कालावधीत त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 16 हजार रुपयांचे तीन मोबईल फोन चोरट्यांनी चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.