संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना तडीपार करा; भीम आर्मीची मागणी

0
529

पुणे, दि. २० (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे  १ जानेवारी २०१९ ला राज्यातील अनेक भागातील नागरिक लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणार आहेत. गेल्या वर्षीची घटना लक्षात घेता २५ डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ पर्यंत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना ५ जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केली आहे.

पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्यात ३० डिसेंबरला दुपारी ३ वाजता भीमा कोरेगाव संघर्ष महासभेला भीम आर्मी संघटनेचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा होणार आहे. मात्र, या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. तर  वर्षभरात भिडेंना राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा सभा घेण्यास परवानगी देत आहे, असा दुजाभाव होता कामा नये, असेही पोळ यांनी म्हटले आहे.