संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
443

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते  प्रवीण गायकवाड यांनी आज (शनिवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेस प्रवेशामुळे प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर  केलेला नाही. पुण्यातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये  घोळ  सुरू आहे.

प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जोरदार  विरोध केला आहे. मात्र, खर्गेंच्या उपस्थितीत गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. आता काँग्रेस गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी देणार की निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.