संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात ८१९ जणांनी केले रक्तदान

0
459

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने काळेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवन येथे काल (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ८१९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या मध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

रविवारी पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन पुणे झोन इंचार्जचे ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या पूर्वतयारीसाठी  फाऊंडेशनच्या माध्यमातून १४ ते २३ जून दरम्यान रक्तदान जनजागृती मोहीम आखण्यात आली होती. या मध्ये पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर या ठिकाणी जाऊन पथनाट्य, बाईक रॅली, पदयात्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच घरा-घरामध्ये जाऊन रक्तदानाची प्रेरणा देण्यात आली.

या शिबिरामध्ये शहराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, संत निरंकारी अनुयायी, विविध धर्माचे नागरिक स्वयंसेवक, सेवादल, स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिल्यामुळे शिबिरामध्ये विशालता, मानव एकता विशेष रूपाने अनुभवता आले.