संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात ४१० जणांनी केले रक्तदान

0
490

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन झोन पुणे ब्रांच भोसरी यांच्या वतीने महानगरपालिका शाळा क्र.९२,मोरेवस्ती येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ४१० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.

यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन दत्ता काका साने (मा.विरोधी पक्षनेता पिं.ची.महानगरपालिका) यांच्या हस्ते करण्यात. तसेच निरंकारी मंडळाचे अंगद जाधव (संयोजक भोसरी सेक्टर), पोपट तावरे (क्षेत्रीय संचालक पुणे क्षेत्र), बाबासाहेब कमाले ( सेवादल संचालक भोसरी), अशोक कोऱ्हाळे, सचिन महानोर उपस्थित होते.

रक्तदानाच्या दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी घेण्याच्या दृष्टीने गेले पंधरा दिवस संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवकसेवादल मोरेवस्ती, चिखली परिसरातील मॉल, चौक तसेच घराघरात, जाऊन संवाद साधून तसेच नाटीका सादर करून रक्तदानाचे महत्व समजावून सांगत होते.