संतापजणक: टोमणे ऐकून रागावलेल्या मुलाने केला वडिलांचाच खून

0
511

अकोला, दि. १९ (पीसीबी) – सत्त वडिलांचे टोमणे ऐकून रागावलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड आणि काठीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१८) रात्री उशीरा अकोला येथील सावरगावमध्ये घडली.

रामसिंग मेघा चव्हाण असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा अंकुश रामसिंग चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथे रामसिंग चव्हाण हे पत्नी, थोरला मुलगा लव आणि धाकटा मुलगा अंकुश यांच्यासोबत राहत होते. साडेतीन एकर शेतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. दररोज काम करायचे आणि पोटाची खळगी भरायची असा या कुटुंबाचा संसाराचा गाडा आहे. धाकटा मुलगा अंकुश हा बारावी शिकलेला आहे.  सतत वडिलांचे बोलणे आणि राग पाहून थातूरमातूर काम करणारा अंकुश वडिलांवर नेहमीच नाराज असायचा. वडिलांच्या या प्रवृत्तीमुळे तो त्यांच्यावर कायम चिडलेला असायचा. दोन दिवसाआधी वडिलांचे आणि त्याचे काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी वडील त्याला रागावले.

वडिलांचा हा नेहमीचा राग त्याला सहन झाला नाही. त्याच्या मनातील वडिलांबद्दलचा राग उफाळून आला आणि त्याने शुक्रवारी (दि.१८) एप्रिलच्या मध्यरात्री शेतात झोपलेल्या वडिलांना दगड आणि काठीने जबर मारहाण करून त्यांना जागेवरच ठार केले. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे उघडकीस आल्यानंतर चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. त्यामध्ये धाकटा मुलगा अंकुश त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.