संकटमोचक हनुमान मालिकेतील बालकलाकार “शिवलेखचा” कार अपघातात मृत्यू

0
560

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – ससुराल सिमर का, संकटमोचक हनुमान तसेच अनेक रियालीटी शोमध्ये काम करणारा बाल कलाकार शिवलेख शिवेंद्र सिंह (वय १४) याचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. तर त्याचे आई-वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात झाला.

प्राप्त माहितीनुसार, शिवलेख आपल्या कुटुंबासह कारमधून रायपूरहून परत येत होता. त्यावेळी धरसीवा भागात त्यांची कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात शिवलेखची आई लेखना सिंह, वडील शिवेंद्र सिंह आणि नवीन सिंह हे नातेवाईक जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा जखमी आणि शिवलेखला पोलिसांनी रायपूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पोलिस आरोपी ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.