शेतकरी, आदिवासी मोर्चेकरांना सरकारचे लेखी आश्वासन

0
429

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी मुंबईत आझाद मैदानावर काढलेला ‘उलगुलान मोर्चा’  मागे घेण्याची शक्यता आहे. कारण शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे, अशी   माहिती गिरीश महाजन यांनी आज (गुरूवार) येथे दिली. 

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना मागण्या मान्य करण्यात आल्या. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलत देण्यात येणार आहे. तर शेतीसाठी खवटी अनुदान देण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली.

तर गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढ्यांची राहिवासीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. याबाबत राज्य केंद्राला शिफारस करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर  वन्य जमीन पट्ट्याच्या प्रकरणातील ८० टक्के दावे सरकारने फेटाळले होते.