पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्ज मार्शलच्या वतीने तीन दिवशीय बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन

0
542

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक दायित्व अंतर्गत आयोजित या महोत्सवाचे शुक्रवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील कार्निवल सिनेमाजमध्ये महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, फोर्ब्ज मार्शलच्या संचालिका रती फोर्ब्ज आदी उपस्थित असतील. या महोत्सवासाठी १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत.

इयत्ता ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे करामती कोट, हेडा होडा, हलो हे हिंदी चित्रपट, इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील विविध प्रतिष्ठित संस्थांचे तज्ज्ञ तसेच चित्रपट तज्ज्ञ प्रसन्ना हुलीकवी यांचे समवेत चर्चा व लघु चित्रपट सादरीकरण करणेत येईल. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त सिंग (हंगेरी), ग्रँडमास हीरो (डेन्मार्क), प्रेस्टो, पायपर आणि ला लुना (पिक्सार), रेड बलून (फ्रान्स), नेबर्स आणि चेरी टेल हे लघु चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे चित्रपट ५ ते २८ मिनिटांचे आहेत. चर्चासत्र मराठीमध्ये असेल. या चित्रपटांमध्ये न्याय, सहकार्य, शांततापूर्ण संघर्ष विवाद, द्याळूपणा, मैत्री, प्रेम, शांतता, मजा आणि मैत्री यासारख्या मूल्यांचे वर्णन आहे.

इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सिनेमा आणि सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सबाबत शिबिंगी दास आणि अभिनव कंदारप यांचे समवेत कार्यशाळेचे आयोजन ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड येथे करण्यात आले आहे. कुमार, सीओओ द्रश्यम व्हीएफएक्स हे ऑटोक्लस्टर ऑडिटोरियम आणि सिटी प्राइड स्कूल, निगडी येथे आहे. या कार्यशाळा माध्यमातून आम्ही मुलांना सामाजिक संदेशासाठी चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून चित्रपट तयार करतेवेळी येणाऱ्या तांत्रिक बाबींची माहिती करुन देण्यात येणार आहे. बाल चित्रपट महोत्सव शहरात विविध ठिकाणी पूर्व नोंदणीसह विनामूल्य आयोजित करण्यात आल्याचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.