भोसरीतील सराईत गुन्हेगार कृष्णा भोसले यांच्यावर तडीपारीची कारवाई

0
826

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – धमकावणे, गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला भोसरी बालाजीनगर झोपडपट्टी येथील सराईत गुन्हेगार कृष्णा उर्फ दाद्या गणेश भोसले (वय १९, रा. नाल्याजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.

कृष्णा भोसले हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. त्याची बालाजीनगर परिसरात प्रचंड दहशत आहे. बुधवारी (दि.२१) परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी कृष्णा याचा तडीपारीचा आदेश काढला. त्यामध्ये त्याला दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचे नमुद केले आहे.