शेखर गोरे शिवसेनेत जाण्याची शक्यता

0
720

सातारा, दि. ७ (पीसीबी) – माण येथील  युवा नेते शेखर गोरे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या समवेत आज मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोरे यांनी पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने राष्ट्रवादीला रामराम करत यापुढे माण विधानसभा निवडणूक अपक्ष लढण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी उघडली. पण या आघाडीतील नेत्यांनी दोन्ही गोरे बंधूंना विरोध केला आहे.

त्यामुळे शेखर गोरेंनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. सध्यातरी  ते मातोश्रीवर पोहोचले त्यांच्या सोबत माण खटावचे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हे आहेत.