शीना बोरा आजही जिवंत आहे, इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा

0
271

नवी दिल्ली ,दि.०३(पीसीबी) – शीना बोरा आजही जिवंत असून राहुल मुखर्जी आणि शीना बोरा २४ एप्रिल २०१२ नंतरही संपर्कात असल्याचा दावा शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे. आज प्रकणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“शीना बोरा आजही जिवंत आहे, असा आमचा दावा आहे. सष्टेंबर-ऑक्टोबर २०१२ पर्यंत ते दोघे संपर्कात असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. शीना बोराला भेटणारा शेवटचा व्यक्ती हा राहुल मुखर्जी होता. त्यामुळे ती कुठं आहे, हे राहुल मुखर्जी सांगू शकतो. मात्र, ती जिंवत असल्याचा आमचा दावा”, अशी प्रतिक्रिया रणजीत सांगळे यांनी दिली आहे.

“शीना तथाकथीत गायब झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ आणि २६ एप्रिल २०१२ रोजी श्यामवर रॉय आणि राहुल मुखर्जी यांचे दोनवेळा मोबाईवर संभाषण झाले होते. २ मे रोजी सुद्धा त्यांनी संपर्क केला होता. मात्र, याबाबत पोलिसांसमोर किंवा सीबीआयसमोर किंवा कलम १६४ अंतर्गत न्यायालयात दिलेल्या जबाबात त्याने असा कोणताही उल्लेख केला नाही. त्याला त्याबाबत विचारले असता, असे संभाषण झाल्याचे आठवत नसल्याचे त्याने सांगितले”, असेही ते म्हणाले.

“शीनाबरोबर लग्न झाल्याचे खोटं विवाह प्रमाणपत्रही राहुलनं बनवल्याचे उलटतपासणीत कोर्टात उघड झाले आहे. याबाबत अनेक पुरावे समोर येत आहेत. मात्र, राहुल उत्तरं द्यायला टाळाटाळ करतो आहे. ‘मला माहित नाही, मला आठवत नाही”, असे उत्तरं तो देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.