शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत, तर युती तुटणार ?

0
478

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत, तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शिवसेना नेते व  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रावते बोलत होते.  

लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचे, तसेच विधानसभेला शिवसेनेला २८८ पैकी १४४ जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळे जर शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत, तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावतेंनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये  मोठ्या प्रमाणात  इनकमिंग झाले आहे. त्यामुळे भाजपला अधिक जागा हव्या आहेत. तसेच केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे युती होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.