मुक्याला बोलके करणे म्हणजे शिक्षण – डॉ. तेज निवळीकर

0
438

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – अजूनही भारतीय समाजात बहुजनांची मुकी संस्कृती आहे. अन्याय हा अन्याय न वाटणे, शोषण करणे हे या संस्कृतीचे दुर्दैव आहे. यासाठी जाणीव जागृती केली पाहिजे, मुक्याला बोलके करणे म्हणजे खरे शिक्षण आहे. महात्मा फुले, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी हे काम केले आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. तेज निवळीकर यांनी येथे केले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आजीवन अध्यापन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. निवळीकर बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “शिक्षणाने ज्ञान मिळते, पण व्यवहाराने शहाणपण मिळते. बाह्य बदलपेक्षा माणसातील अंतर्गत परिवर्तन घडून येते.

यावेळी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांचे आजीवन अध्यापन व विस्तार विभाग प्रमुख डॉ. धनंजय  लोखंडे, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटचे रिसर्च सेंटर प्रमुख डॉ. हंसराज थोरात यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरतेवर आपले विचार व्यक्त केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, डॉ. नीलकंठ डहाळे, डॉ. भारती यादव उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कामायनी सुर्वे व डॉ. प्रतिमा कदम यांनी केले. तर प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी आभार मानले.