शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा,” – शिवसेना

0
598

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष दिवंगत इंदिरा गांधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटायच्या असं वक्तव्य केले होते. त्यावरुन झालेल्या वादानंतर सामनाच्या अग्रलेखामधून हा वाद म्हणजे ‘बाटग्यांची उठाठेव’ असल्याचे सांगत हा ‘फक्त विरोधासाठी विरोध’ असल्याचे म्हटले आहे. “भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच आहे,” अशा शब्दांमध्ये ‘सामना’च्या अग्रलेखामधून भाजपाला टोला लगावण्यात आला आहे. “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो,” अशी टीकाही या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

#अग्रलेख बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठी विरोध. पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर…

Gepostet von Sanjay Raut am Donnerstag, 16. Januar 2020