‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’; शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंचं भगवं पोस्टर

0
836

मुंबई,दि.१७(पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आलं आहे.

सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेला डिवचण्यासाठीच मनसेने हे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावल्याचीही चर्चा होत आहे.दुसरीकडे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली गुप्त भेट उजेडात आल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.