“शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागलीये”

0
260

मुंबई,दि.२८(पीसीबी) – शनिवारी दुपारी फडणवीस-राऊत यांची ग्रँड हयात या हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा अचानक समाजमाध्यमांवर सुरू झाली. त्या भेटीमध्ये नक्की काय घडले, येथपासून ते राज्यातील आघाडीचे सरकार पडणार का, येथपर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या भेटीवर नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये, अशी टीका त्यांनी केलीये. त्यांनी या संदर्भात एक ट्विट पोस्ट केली आहे.

‘असं वाटतंय शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्दी उद्ध्वस्त करते. ही दुर्भावना नाही तर, वास्तविकता आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

दरम्यान युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच दोन पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाल्याचा खुलासा भाजपने केल्यानंतर या चर्चांना तूर्तास विराम मिळाला आहे.