मला जर कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारणार; भाजप नेत्याचं वक्तव्य

0
378

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) – मला जर कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेले अनुपम हाजरा यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान अनुपम हाजरा यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, आमचे कार्यकर्ते कोरोना व्हायरसपेक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत लढत आहेत. मात्र तरीही त्यांना कोरोना झाला नाही, असंही हाजरा यांनी म्हटलं आहे.