शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव  नवीन पक्ष काढणार  

0
893

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

हर्षवर्धन जाधव कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. येत्या २७ ऑगस्टला  मुंबईमध्ये  राजकीय पक्ष  काढण्यासंदर्भात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.