“शिक्षक हा हाडाचा कवी असतो! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
317

पिंपरी, दि.६ (पीसीबी) – “शिक्षक हा हाडाचा कवी असतो! आपल्या भारतभूमीत ‘महाभारत’कार व्यास, चक्रधरस्वामी, महदंबा, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई अशा संतकवींनी जनप्रबोधन करून शिक्षकाची भूमिका निभावली आहे!” असे विचार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढरकरनगर, आकुर्डी येथे रविवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२१ रोजी व्यक्त केले. शिक्षकदिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंच आयोजित काव्य पुरस्कारप्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते कवी आणि शिक्षकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. बीना एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक इक्बालखान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, नंदकुमार मुरडे, शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भारताचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून काव्यपुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली. रघुनाथ पाटील यांना ‘गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तर महेंद्रकुमार गायकवाड, दत्ता गुरव, नंदकुमार कांबळे, शामराव सरकाळे, फुलवती जगताप यांना ‘छावा काव्य पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाबू डिसोजा यांना त्यांच्या निवासस्थानी ‘अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तसेच श्रीकांत चौगुले, शामला पंडित-दीक्षित, काजमीन शेख आणि पूनम गुजर या शिक्षकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, “समाजात एकमेकांना दूषणे देणारी विपरीत सामाजिक परिस्थिती असताना कवी आणि शिक्षकांचा सन्मान होतो आहे, ही निखळ आनंदाची बाब आहे!” असे गौरवोद्गार काढले. नंदकुमार मुरडे यांनी ‘पुरस्कार’ या विषयावर अभिवाचन केले. या प्रसंगी सभागृहात पुरुषोत्तम सदाफुले, नितीन हिरवे, सागर आंगोळकर, आनंद मुळूक, दत्तू ठोकळे, आत्माराम हारे, राजू जाधव, नीलेश शेंबेकर, प्रशांत पोरे, सुहास घुमरे, अशोक गोरे, कैलास भैरट, सविता इंगळे, शोभा जोशी, उज्ज्वला केळकर, शिवाजीराव शिर्के, हेमंत जोशी, रमेश वाकनीस, सुप्रिया लिमये, वर्षा बालगोपाल, देवेंद्र गावंडे, अभिजित काळे, रामचंद्र प्रधान, निर्मला वाल्हेकर, अलका जोशी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या संयोजनात संगीता झिंजुरके, मधुश्री ओव्हाळ, जयश्री गुमास्ते, अंतरा देशपांडे, शरद काणेकर, प्रथमेश जगदाळे यांनी परिश्रम घेतले. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत गुमास्ते यांनी स्वागतगीत म्हटले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाश घोरपडे यांनी भैरवी गायन करून आभार मानले.