शास्त्रज्ञ भास्करदत्त गोरटी यांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह उरणच्या खाडीत सापडल्याने खळबळ

0
664

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्करदत्त गोरटी यांचा बेपत्ता मुलगा नमन गोरटी याचा मृतदेह उरण खाडीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नमन गोरटी बेपत्ता झाला होता.

रविवारी (दि.२३) रात्री दहाच्या सुमारास भास्कर दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता नमन न सांगता घराबाहेर पडला तो परतलाच नाही. रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी त्याने वाशीहून सीएसटीला जाणारी ट्रेन पकडली. मागील १२ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा मृतदेह उरणच्या खाडीत आढळला आहे. मात्र नमनचा मृतदेह सापडल्याने आता त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास वाशी पोलीस घेत आहेत.