शानदार ‘बीएमडब्ल्यू एक्स 5’ चे सचिनच्या हस्ते भारतात अनावरण

0
577

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – बीएमडब्ल्यू या कारनिर्मितीतील आघाडीच्या कंपनीने एक्स ५ या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचे भारतात गुरुवारी अनावरण केले. मुंबईत पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीचा सदिच्छादूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या आलिशान आणि दणकट गाडीचे अनावरण करण्यात आले.

बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स ५ मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत. पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री २०१९ च्या अखेरीस सुरु होईल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरुम किमती या ७३ ते ८३ लाखांच्या घरात आहेत.

बीएमडब्ल्यू एक्स ५ ड्राईव्ह ३० डी ‘स्पोर्ट’ – ७२ लाख ९० हजार

बीएमडब्ल्यू एक्स ५ ड्राईव्ह ३० डी ‘एक्स लाईन’ – ८२ लाख ४० हजार

बीएमडब्ल्यू एक्स ५ ड्राईव्ह ४० आय ‘एम स्पोर्ट’ – ८२ लाख ४० हजार

१९५ किलोवॅटचे शक्तिशाली बीएस ६ श्रेणीतले इंजिन २६५ हॉर्सपॉवरची ताकद या गाडीला उपलब्ध करुन देते. एसएव्ही (स्पोर्ट्स एक्टिव्हीटी व्हेईकल) श्रेणीतील ही कार आपल्या ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ताशी ० ते १०० किमी. चा वेग अवघ्या सहा सेकंदात गाठू शकते. बीएमडब्ल्यूची एक्स ड्राईव्ह टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग कंडिशननुसार गाडीत ऑटोमेटिक बदल करुन घेते.