देहुरोडमध्ये दहा ते बारा जणांच्या टोळक्यांकडून तरुणाला जबर मारहाण

0
762

देहुरोड, दि. १६ (पीसीबी) – दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला लोखंडी रॉड आणि पाईपने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.१४) रात्री आठच्या सुमारास देहुरोड येथे घडली.

सचिन अशोक निकम (वय ३१, रा. देहुरोड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश, सत्वेल चिन्नस्वामी, मदन चिन्नस्वामी उर्फ टोकल, चिंझी, शहशहा आणि अज्ञात सात जणांविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दहा ते बारा जणांचे टोळके हे फिर्यादी सचिन यांच्या घरासमोर आले. तसेच त्यांना लोखंडी रॉड आणि पाईपने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. आणि पसार झाले. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.