शहानुर नदी पात्रात कार पलटी मध्ये मृतक आढळलेली, ती व्यक्ती केंद्रीय श्रम प्रवर्तन अधिकारी

0
538

अमरावती :- जिल्यातील दर्यापुर तालुक्यातील भामोद येथील शहानुरनदीपात्रात आढळलेल्या कारला रेस्क्यू टीमने यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे .यामध्ये केंद्रीय श्रम प्रवर्तन अधिकारी अमित कुमार नेहरा वय 33 राहणार नागपूर यांचा मृतदेह आढळला आहे. याकरता संपूर्ण दिवसभर रेस्क्यू टीमला मोठे परिश्रम घ्यावे लागले आज सकाळी भामोद परिसरातील काही शेतकऱ्यांना शहानुर नदीपात्रामध्ये उलटी पडलेली कार आढळून आल्याने चर्चेला ऊत आला होता.

यावेळी दर्यापूर तहसीलदार व पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू टीमला पाचारण केले होते संपूर्ण दिवसभर रेस्क्यू टीमने या कारला काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले अखेर सायंकाळी सहा वाजता या कारला बाहेर काढण्यात यश आले. या कारमध्ये एक मृतक आढळला असून सदर गाडी ही हरियाणा पासिंग असल्याचे सांगितले जात आहे या गाडीचा क्रमांक HR 77, 7205 आसून पांढऱ्या रंगाची मारुती रीड्स कंपनीची ही कार आहे.

या कारमध्ये आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव अमित कुमार नेहरा वय 30 राहणार पीडब्ल्यूडी पोलीस स्टेशन गिट्टीखदान नागपुर असा पत्ता आहे यासंधी पोलीस स्टेशन मध्ये श्रम प्रवर्तन कार्यालयातर्फे व्यक्ती हरवल्याची तक्रार 27 /9/ 21 ला देण्यात आली होती. सदर व्यक्ती हे केंद्रीय श्रम वर्तन अधिकारी या पदावर कार्य करीत होते.

दिनांक 27 – 09 ला जळगाव येथून नागपूर जाण्याकरता संध्याकाळी सात वाजता निघाले सदर मार्ग हा दर्यापूर वरून जात असल्याने ते भामोद या गावातील पुलावरून शहानुर नदीपात्रामध्ये अपघात ग्रस्त झाल्याचे समजते एकंदरीत सदर अपघात हा दोन दिवसांपूर्वी झालेला असल्याचे निदर्शनास आले.

असून आज सदर अपघाताची घटना उघडकीस आली आहे दर्यापूर तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्छाव रेस्क्यू टीम चे कर्मचारी व भामोद लोटवाडा परिसरातील नागरिकांनी या कामी मदत केली.