‘…म्हणून पोलीस अधिकाऱ्यासह तो पोलीस कर्मचारी पण अखेर निलंबित’

0
325

पुणे, दि.०१ (पीसीबी) : एका अर्जाच्या चौकशीबाबत गंभीर बाब समोर आल्याने एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हा निलंबनाचा आदेश काढला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलीस नाईक ज्ञानेश्वर पालवे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत होती. त्यात ते प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संतोष सोनवणे हे नियंत्रण कक्ष येथे सध्या नियुक्तीला होते. तर, ज्ञानेश्वर पालवे हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. एका अर्ज चौकशी प्रकरणात प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध गंभीर बाबी निष्पन्न झाल्या आहेत. त्यामध्ये त्यांचे नैतिक अंध:पतन व गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केल्याचे व संबंधित अर्जदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना 30 सप्टेंबरपासून निलंबित करण्यात आले आहे