पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राला पेटवलं.. धक्कादायक घटनेनं शहर हादरलं

0
327

पुणे, दि. १ (पीसीबी) – हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्यावरून वाद झाल्यानंतर पेट्रोल टाकून तरुणाला जाळल्याचे समोर आला असून, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. हडपसर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

संतोष कागदे (वय 51) अस मृत्यू झालेल्याचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28) याला पकडले आहे. हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात मैत्री होती. मनोज याने संतोषकडून पैसे घेतले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला असता तुला खल्लास करतो असे म्हणत अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटीने पेटवून दिले. यात गंभीर जखमी झाल्याने संतोष यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पंरतु त्यांचा रात्री मृत्यू झाला. याबाबत खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.