शहरातील चार रुग्ण कोरोनामुक्त, १५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

0
545

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन आज (बुधवारी) आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत बरे झाले आहेत. यामुळे या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आज शहरातील 158 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील पण, महापालिका रुग्णालयात दाखल अशा 115 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी शहरातील तीन आणि शहराबाहेरील दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.