कर्जमाफी प्रकरणात निर्मला सितारामनचे राहुल गांधींना खर्मरीत उत्तर; कर्ज वसुलीचा दिला हिशोब

0
806

प्रतिनिधी (पीसीबी) : ५० डिफाॅल्टर्सच्या थकीत कर्ज प्रकरणामुळे देशभर वादळ उठले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांना १३ ट्विट करुन खर्मरीत उत्तर दिले. काॅंग्रेस नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सितारामन यांनी केला. 

मेहुल चोकसी, निरव मोदी, विजय माल्या सहित ५० विलफुल डिफाॅल्टर्सचे ६८,६०७ कोटींची थकीत रक्कम बुडीत खात्यात टाकल्याची माहिती रिजर्व बैंकेने आरटीआय अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामुळे समोर आली. त्यानंतर काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. संसदेमध्ये देशातील ५० बैंक चोरांची यादी मी मागितली होती, परंतु अर्थमंत्र्यांनी तेव्हा माहिती देण्यास नकार दिला होता, आता रिजर्व बैंकेने मेहुल चौकशी, नीरव मोदी, विजय माल्या सहित भाजपच्या मित्रांची नावे बैंक चोरांच्या यादीत टाकल्याची टीका राहुल गांधीनी ट्विटद्वारे केली होती.

अर्थमंत्री सीतारामन यांनी एक एक करून १३ ट्विट केले. यामध्ये विजय माल्यापासून ते नीरव मोदी पर्यंत कर्ज वसुलीसाठी बीजेपीने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामून बैंकांचे थकबाकीदार, बैंकांचे थकीत कर्ज आणि बुडीत खाते याबाबत जनतेची दिश्भूल करण्याचा प्रयत्न चालविले आहे. सन २००९ ते २०१४ दरम्यान विविध बैंकांनी १,४५,२२६ कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात टाकले. राहुल गांधी यांनी ते कसले बुडीत खाते होते याची माहिती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून घ्यावी असा सल्ला सीतारामन यांनी दिला. थकीत कर्जाबाबत रिजर्व बैंकेने चार वर्षांचे प्रावधान चक्राच्या हिशोबाने नियम तयार केले आहेत. हे चक्र पूर्ण होताच असे थकीत कर्ज बुडीत खात्यात टाकण्यात येते, परंतु थकबाकीदारांकडून वसुलीचे प्रयत्न सुरूच असतात. कोणतेही कर्ज माफ केले नाही असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मेहुल चोकसीची १९३६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संपत्ती जप्त अटाॅच केली आहे. त्यामध्ये ६७.९ कोटी रुपये किमतीची विदेश्तील संपत्ती देखील अटाॅच करण्यात आली आहे. याशिवाय मेहुल चोकसी याची ५९७.७५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस सुद्धा काढण्यात आली आहे. चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी एंटीगुआ कडे अर्ज करण्यात आला आहे व त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले की विजय माल्याची सुमार ८,०४० कोटी रुपयांची संपत्ती अटाॅच करण्यात आली आहे आणि १,६९३ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. इंग्लंडमध्ये माल्याच्या प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरु असून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. सीतारामन यांनी देशातून फरार झालेला आरोपी नीरव मोदी सध्या इंग्लड येथील तुरुगांत असून त्याची सुमारे २,३८७ कोटी रुपयांची संपत्ती शासनाने अटाॅच केली आहे असे सीतारामन यांनी सांगितले.