शरद पवार पूरग्रस्त भागांत जाऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणार

0
637

मुंबई, दि.  १४ (पीसीबी) –  कोल्हापूर, सांगलीतील पूरपरिस्थिती आटोक्यात येऊ लागली आहे.   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागामध्ये जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. मंगळवारी रात्री ते कराडमध्ये दाखल झाले असून बुधवारी सकाळी ते हातकणंगले आणि शिरोळमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

शिरोळमध्ये १५ ऑगस्टला ध्वजवंदन केल्यानंतर पवार हातकणंगले आणि कोल्हापूरकडे रवाना होतील. यानंतर कोल्हापूरजवळील चिखली, आंबेवाडी, वडणगे या गावात जाऊन ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतील आणि तेथील पूरग्रस्तांशी संवाद साधून अडीअडचणी समजावून घेतील.

दरम्यान, सांगली- कोल्हापूरात आलेल्या महापुरामुळे शेती, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारने गतीने सुरू केले आहे. सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय सामाजिक, विविध संस्था, संघटना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. राष्ट्रवादीनेही   मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे.