शरद पवारांनी बारामतीच्या गाडीसाठी रेल्वेचे इंजिन भाड्याने घेतले – मुख्यमंत्री  

0
699

सासवड, दि. १८ (पीसीबी) – एके काळी लोक सायकल, रिक्षा भाड्याने घेत होते. आता चक्क रेल्वे इंजिन भाड्याने घेतले  जात आहे.  बंद पडत चाललेली बारामतीची गाडी पुढे न्यायची आहे. पण ते इंजिन कोळशाचे आणि चित्रातील आहे.  त्यामुळे कॅप्टन पवार आता राखीव खेळाडूच्या भूमिकेत आहेत,  अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.  

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सासवड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत फडणवीस यांनी मनसे आणि शरद पवार यांच्यावर तोफ डागली.

मुख्यमंत्री म्हणाले की,  देशात मोदींची हवा आहे,  हे लक्षात आल्यानंतर पवारांनी ४८ जागांची काळजी सोडून मुलीसाठी व नातवासाठीच  फिरू लागले  आहेत.  माढा आणि बारामती, मावळ आम्हीच जिंकणार  असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.