राहुल गांधींचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा, उमेदवारी अर्ज वैध

0
449

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेठीमधील अपक्ष उमेदवार ध्रुवलालने राहुल गांधी भारतीय नसल्याचे कारण देत तक्रार दाखल केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज वैध ठरवत राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे.

ध्रुवलाल यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आज त्यावर सुनावणी झाली. यामध्ये राहुल गांधींच्या वकिलाने बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर निवडणुक आयोगानं राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे.

ध्रुवलाल यांचा आरोप

निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये उमदेवार ध्रुवलाल यांनी म्हटले आहे की, राहुल यांनी युकेतील एका कंपनीच्या कागदपत्रांमध्ये ते ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले आहे आणि एक विदेशी व्यक्ती येथून निवडणूक लढवू शकत नाही. शिवाय, राहुल यांच्या पदवीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंच नाही असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता.