शरद पवारांचा प्रचार करायचा, तर भाजपमुळे मिळालेली पदे सोडा – सुभाष देशमुख

0
715

पंढरपूर, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पदे सोडा, अशा शब्दांत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि पालकमंत्री विजय देशमुख यांचे नाव न घेता  निशाणा साधला.

आज (रविवार) पंढरपूरमध्ये सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठक झाली. या बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.  भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने सुभाष देशमुख चांगलेच संतापले.

माढ्यामधून शरद पवार आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा भाजपसाठी आव्हान बनलेले असताना या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. या बैठकीकडे पक्षाच्या महासचिव सरोज पांडे यांनीदेखील पाठ फिरवल्याने पदाधिकारी देखील अस्वस्थ झाले आहेत. आजच्या क्लस्टर बैठकीसाठी जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते येतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती.