शरद पवारांचा दुष्काळ म्हणजे राजकारणासाठी राजकारण – मुख्यमंत्री फडणवीस

0
673

सांगली, दि. २४ (पीसीबी) – तुमच्या काळात दुष्काळ शब्दच तुम्ही उडवून टंचाईसदृश्य’ असा शब्द योजला होता. तुम्ही सत्तेत होता, तेव्हा दुष्काळ शब्दच नव्हता. मात्र, आम्ही दुष्काळ शब्द वाढवून ‘दुष्काळसदृश्य’ असे जाहीर केले आहे. तुम्ही दुष्काळ म्हणा, महादुष्काळ म्हणा, आम्ही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये, अशा शब्दांत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.

शरद पवारांचा दुष्काळ म्हणजे राजकारणासाठी राजकारण असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस सांगलीमध्ये आज (बुधवार) बोलत होते.

राज्यात दुष्काळसदृश्य नाही, तर दुष्काळच घोषीत करावा, अशी परिस्थिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे.