तनुश्री दत्ताने माझ्यावर १२ वर्षांपूर्वी बलात्कार केला राखी सावंतचा खळबळजणक आरोप

0
747

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  तनुश्री दत्ताने माझ्यावर १२ वर्षांपूर्वी बलात्कार केला असल्याचा धक्कादायक आरोप राखी सावंतने आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला. तनुश्री दत्ताने केलेल्या या कृत्या बद्दल मी पोलिसातही तक्रारही नोंदवली असल्याची माहिती राखीने पत्रकारांना दिली.

तनुश्री दत्ताने २२ ऑक्टोबरला राखी सावंतवर १० करोड रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला होता. यावर तनुश्रीच्या वकिलांनी म्हटल्याप्रमाणे राखी सावंतला २ वर्ष कैद आणि मानहानीची रक्कम भरावी लागणार होती. त्याचबरोबर त्यांना माफीही मागावी लागेल, असेही तनुश्रीच्या वकिलांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज राखी सावंतने पत्रकार परिषदेत एक नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. तनुश्री दत्ताने माझ्यावर १२ वर्षांपूर्वी बलात्कार केला. तनुश्री दत्ताने केलेल्या या कृत्या बद्दल मी पोलिसात तक्रारही नोंदवली असल्याचे तिने सांगितले. या संदर्भात माझाकडे पुरावे देखील असून, ते मी कोर्टात सादर करेन. तसेच, तनुश्रीविरोधात ५० करोड रुपयांचा मानहानी दावा ठोकणार असल्याची माहिती राखीने पत्रकार परिषदेत दिली आहे. यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले आहे.