शपथविधी आधी उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची भेट

0
335

मुंबई,दि.२७(पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं.

विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्षांची शपथ देण्यात आली. त्यानंतर सर्व नवनर्वाचित आमदारांना शपथ देण्यास सुरूवात केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे.