विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: भारताची आज पहिली लढत साऊथ आफ्रिकेसोबत

0
632

नवी दिल्ली, दि, ५ (पीसीबी) – २०१९ विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. साऊदम्पटनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. हाशिम आमलाही फारसा तंदुरुस्त नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सलग दोन पराभवांमुळे खचलेला आफ्रिकेचा संघ आजच्या सामन्यात कसा खेळ करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे टीम इंडिया आज आपला पहिलाच सामना खेळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न महत्वाचा बनला होता. सराव सामन्यात लोकेश राहुलने शतक झळकावत या प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढला आहे. त्यातच आजच्या सामन्याआधी साऊदम्पटनमधले हवामान थोडसे ढगाळ होते, त्यामुळे आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची शक्यता बोलली जात आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.