दुष्काळी दौऱ्यातील सत्कार स्वीकारणार नाही – अजित पवार

0
652

पुणे, दि. ५ (पीसीबी) – राज्यातील दुष्काळाची परिस्थिती भीषण  असून  बारामती आणि दौंड तालुक्यातील  दुष्काळी गावांना  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (बुधवार) भेट दिली. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून होणारा सत्कार आपण स्वीकारणार नाही, अशी भूमिका  पवार यांनी घेतली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  अजित पवार यांचा एकत्रित बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात शरद पवार आणि अजित पवार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी दिल्या. खैरेपडळ गावापासून त्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी दुष्काळी गावातील चारा छावण्यांना भेटी दिल्या तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बारामती तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. दरम्यान, ७ जून रोजी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांच्याशी दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत, अशी   माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.