विवाहितेच्या छळ प्रकरणी पती, सासुवर गुन्हा

0
350

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – लोकांचे उसने पैसे देण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पती आणि सासूने विवाहितेचा छळ केला. ही घटना ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत दिघी परिसरात घडली.

पती स्वप्नील रामचंद्र बांदल (वय 32), सासू (वय 58) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी विवाहितेने तिच्या आई वडिलांकडून पैसे आणावेत, अशी मागणी पती आणि सासूने केली. फिर्यादी यांच्या आई वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी विवाहितेचा टोमणे मारून छळ केला. तिला शिवीगाळ करत तिला स्वतःच्या खर्चासाठी लागणारे पैसे न देता सासरी नांदवण्यास आरोपींनी नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.