घरात घुसून मोबाईल पळवला; फोनवर अश्लील बोलत महिलेचा विनयभंग

0
258

रहाटणी, दि. १० (पीसीबी) – महिलेच्या घरात घुसून मोबाईल फोन पळवून नेला. महिलेने तिच्या मोबाईलवर फोन केला असता मोबाईल पळवणा-या चोरट्यांनी महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिच्याशी अश्लील बोलून विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी एक ते रविवारी (दि. 9) दुपारी बारा वाजताच्या कालावधीत घडली.

पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी), मंगेश माने (वय 21, रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलीच्या हातातून फिर्यादी यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईल क्रमांकावर फोन केला असता आरोपींनी फिर्यादी महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच महिलेसोबत अश्लील भाषेत बोलूनत्यांचा त्यांचा विनयभंग केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.